Breaking | गुणरत्न सदावर्तेंविरोधातील कॅन्सलेशन बेल अॅप्लिकेशन रद्द
सदावर्ते यांना लोअर कोर्टमधून बेल मंजूर झाली होती. ती रद्द करण्यासाठी हे ॲप्लिकेशन करण्यात आलं होतं. आम्ही त्याचा विरोध केला कारण आम्ही कोर्टाला सांगितलं की, या मॅटरमध्ये कुठलाही मेरिट नाही.
नागपूर : गुणरत्न सदावर्ते आणि मिसेस पाटील यांच्याविरोधात कॅन्सलेशन बेल अप्लिकेशन टाकण्यात आली होती. ती कोर्टाने रद्द केली आहे. सदावर्ते यांना कनिष्ठ कोर्टमधून बेल मंजूर झाली होती. ती रद्द करण्यासाठी हे ॲप्लिकेशन करण्यात आलं होतं. आम्ही त्याचा विरोध केला कारण आम्ही कोर्टाला सांगितलं की, या मॅटरमध्ये कुठलाही मेरिट नाही. अशा केसेसमध्ये कुठलाही मेरिट नसल्याने आणि लावलेले आरोप हे ग्राह्य धरण्यासाठी पुरावे नाही आहेत. त्यामुळे तक्रारदाराने केलेली कंप्लेंट रद्द करण्यात आली. आता जी ट्रायल आहे, ती इंडिपेंडेंट सुरू राहिल. कारण यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर झाल्या होत्या. ते कंटिन्यू होणार आहे, असं सदावर्ते यांचे वकिल कार्तिक शुक्ला यांनी सांगितलं.
Published on: Aug 11, 2022 01:49 AM