वर्षापूर्वीचे प्रकरण, नगरसेवक किरण लांडगे यांना अटक, शिंदे गटावर काय आरोप ?
उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांना अटक करण्यात करण्यात आल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. किरण लांडगे हे १६० वॉर्डचे माजी नगरसेवक आहेत.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांना अटक करण्यात करण्यात आल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. किरण लांडगे हे १६० वॉर्डचे माजी नगरसेवक आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या प्रभागातील पाणी प्रश्नावरून पालिका कार्यालयावर पाणी मोर्चा काढला होता. त्यावेळी काही शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे नगरसेवक किरण लांडगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने माजी नगरसेवक किरण लांडगे यांचा जमीन रद्द केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. याची माहिती कळताच शिवसैनिकांनी विनोबा भावे पोलीस स्टेशनवर धाव घेतली. यात महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. शिंदे गटाच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत असा आरोप या महिलांनी केला. त्यांची समजूत काढण्यासाठी अखेर पोलिसांना किरण लांडगे यांना बाहेर आणले.