Special Report | संजय राऊत दुहेरी संकटात-tv9
आता महिला आयोगानंही पोलिसांकडे चौकशीचा अहवाल मागवलाय. मात्र संबंधित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली नसल्याचंही राऊतांनी म्हटलंय. कथित ऑडिओ क्लीपचं प्रकरण समोर येताच, भाजपनं तर याही प्रकरणात राऊतांना तात्काळ अटकेची मागणीही केली होती.
संजय राऊत सध्या दुहेरी संकटात अडकलेत..एक तर पत्राचाळ प्रकरण..आणि दुसरं प्रकरण आहे, स्वप्ना पाटकर या महिलेला केलेली कथित शिवीगाळ, विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपचा संबंधही पत्राचाळ प्रकरणाशी आहे, स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीनंतर मुंबईतल्या वाकोला पोलीस स्टेशनमध्ये राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आणि स्वप्ना पाटकर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात साक्षीदार आहेत. या ऑडिओ क्लीपची TV9 पुष्टी करत नाही. मात्र ही क्लीप आणि पाटकरांच्या तक्रारीनंतर राऊतांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. याच ऑडिओ क्लीपच्या आरोपांवर, संजय राऊतांना पत्रकारांनी त्यांच्या रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत प्रश्नही विचारला. पण प्रश्न विचारताच ते उठून गेले. आता महिला आयोगानंही पोलिसांकडे चौकशीचा अहवाल मागवलाय. मात्र संबंधित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली नसल्याचंही राऊतांनी म्हटलंय. कथित ऑडिओ क्लीपचं प्रकरण समोर येताच, भाजपनं तर याही प्रकरणात राऊतांना तात्काळ अटकेची मागणीही केली होती.