संजय राऊत कॅशियर ? किती पैसे आले ते सांगा ? शिंदे गटाच्या आमदारांचा थेट हल्लाबोल
नगरसेवक आणि शाखाप्रमुख 50 लाख, आमदार 50 कोटी, खासदार 100 कोटी अशी रक्कम दिली गेली. आता शिवसेना आणि धनुष्यबाण ताब्यात घेण्यासाठी मोठा सौदा केला.
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पक्ष आणि चिन्ह यासाठी मोठा सौदा करण्यात आला. नगरसेवक आणि शाखाप्रमुख 50 लाख, आमदार 50 कोटी, खासदार 100 कोटी अशी रक्कम दिली गेली. आता शिवसेना आणि धनुष्यबाण ताब्यात घेण्यासाठी मोठा सौदा केला. त्याचा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. 2000 कोटी खर्च केले अशी माहिती असल्याचा थेट आरोप केला आहे. त्याला शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट उत्तर दिले आहे. आज महत्वाचा दिवस आहे. या दिवशी अभद्र बोलण्याची परंपरा संजय राऊत यांनी कायम ठेवली आहे. दोन, अडीच वर्ष ते एखादा कॅशियर असावा असे वागत आहेत. कॅशियरने पैसे मोजून गल्ल्यात किती पैसे आलेत हे सांगावे अशा प्रकारचे आरोप संजय राऊत करत आहेत. त्यांच्या आरोपांमधून त्यांची संस्कृती आणि त्यांचे विचार जनतेसमोर येत आहेत, अशा शब्दता त्यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Published on: Feb 19, 2023 01:19 PM