समीर वानखेडे कथित लाच प्रकरणात मोठी अपडेट; सीबीआयकडून शाहरुख खान, आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता

| Updated on: Jun 21, 2023 | 12:51 PM

एनसीबी झोनलचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित लाच प्रकरणी सीबीआय आता बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि आर्यन खानचा जबाब नोंदवणार आहे. समीर वानखेडे कथित लाच प्रकरणातील ही मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई : एनसीबी झोनलचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित लाच प्रकरणी सीबीआय आता बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि आर्यन खानचा जबाब नोंदवणार आहे. समीर वानखेडे कथित लाच प्रकरणातील ही मोठी बातमी समोर आली आहे. कधिथ खंडणी प्रकरणी समीर वानखेडे अडचणीत आहेत. खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने समीर वानखेडे कथित लाच प्रकरणाची चौकशी केली होती. या प्रकरणात वानखेडेंची सविस्तर चौकशी करण्यासाठी सीबीआय कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

Published on: Jun 21, 2023 12:51 PM
पुण्यात जागतिक योग दिनाला परदेशी पाहुण्यांची हजेरी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही योगा
Maharashtra Politics : साताऱ्यात दोन राजांचा वाद पेटला; उदयनराजे शिवेंद्र राजे यांचा कार्यक्रमच उधळला