केंद्राच्या कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र, शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

| Updated on: Dec 29, 2023 | 9:21 PM

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी लागू केल्याने 20 दिवसांनी कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईने क्वींटल मागे मजूरी वगैरे जाऊन दोनशे रुपये हातात आले आहेत. या दोनशे रुपयांत मुलांना काय घेऊन द्यायचे असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना स्वत:ला संपविण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

नाशिक | 27 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने अचानक कांद्यावरील निर्यात बंदी लागू केली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळेनासा झाला आहे. केंद्राच्या निर्यात बंदीचा निर्णय घेण्याआधी सरासरी चार ते पाच हजार प्रति क्वींटल कांद्याचे भाव होते. मात्र केंद्राच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये प्रति क्वींटल 60 ते 70 टक्के घसरण झाली आहे. गाडी वाहन चाळीस रुपये भाडे आहे. आज कांद्याला हजार-बाराशे भाव मिळाला आहे. नवीन वर्षे शेतकऱ्यांसाठी चांगले जाईल अशी आशा होती. परंतू आता केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमचं भाडे देखील वसुल होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जीवन संपविणे भाग पडेल यास सर्वस्व मोदी सरकार जबाबदार असेल असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 27, 2023 08:15 PM
राम मंदिराचं निमंत्रण मिळाले का ? काय म्हणाले शरद पवार
बावनकुळे यांच्यामुळे भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला, अमोल कोल्हे यांची टिका