थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
संगमनेर येथील सभेत सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. त्यानंतर काल रात्री थोरात आणि विखे समर्थकांत मोठा राडा झाला आहे. याची दखल केंद्राने देखील घेतली आहे.
संगमनेर येथे काल कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे – पाटील यांच्या समर्थकांमध्ये काल मोठा राडा झाला आहे. सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांची तक्रार नोंदविण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ घेण्यात आल्याची टीका जयश्री थोरात यांनी केली आहे. या वेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची आणि बॅनरची तोडफोड केली आहे. या राड्याची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील घेतली आहे. राज्य महिला आयोगाने देखील या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलिसांकडे केली असून कारवाईचा अहवाल तातडीने मागविला आहे.