दोनदा यशाने हुलकावणी दिली, ती खचली नाही ना थांबली नाही… यंदा यूपीएससीत राज्यात पहिली… डॉ. कश्मिरा संखे
या परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. तर तिचा देशपातळीवर 25 वा रँक आहे.
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. तर तिचा देशपातळीवर 25 वा रँक आहे. हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता. मागील दोन प्रयत्नात त्या प्रिलीम परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी सर्वच पातळ्यांवर मला यश मिळालं आणि त्यांनी लखलखतं यश मिळवलं आहे. या आनंदाच्या क्षणी, त्यांनी निकालाकडून काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मात्र, आशा नक्कीच होती. जेव्हा निकाल लागला तेव्हा काहीवेळ विश्वास बसत नव्हता. या यशाचं श्रेय त्यांनी आई-वडीलांना देताना, लहानपणापासून मी यूपीएससीचं स्वप्न पाहिलं होतं असेही त्या म्हणाल्या. तर महाराष्ट्रात काम करायला मिळालं तर आवडेल असेही त्या म्हणाल्या.