मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
ठाणे ते कांजूरमार्गादरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. ऐन ऑफीस निघण्याची घाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने वेळापत्रक कोलमडले आहे.