भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरील आसामच्या दाव्यावरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, आता सगळंच…

| Updated on: Feb 16, 2023 | 2:56 PM

आसामकडून भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा....

नाशिक : आसामकडून भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगच काय सगळंच घेऊन जा … आधी उद्योग नेले. आता ज्योतिर्लिंगावर दावा करताय. तेवढंच आता राहिलं होतं. तेही न्या, असं छगन भुजबळ म्हणालेत. सध्या काय चालू आहे, मला काही कळत नाही. सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अशी चर्चा निर्माण केली जाते. असं मला वाटतं, असंही भुजबळ म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 02:56 PM
सत्तासंघर्षाची सुनावणी 7 सदस्यीय घटनापीठाकडे गेली तर निकाल किती लांबणार? काय म्हणताय घटनातज्ज्ञ उल्हास बापट?
‘स्वतः ढोंगी असलेल्या माणसाने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?