चुली, सरपण सोबत घ्या, आपल्या वाहनालाच घर बनवा, जरांगे पाटील यांचे ‘चलो मुंबई’

| Updated on: Dec 29, 2023 | 9:17 PM

मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीला अंतरवेली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. यावेळी आरक्षण घेऊनच परतायचे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आरक्षणासाठी ही शेवटची आरपारची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी मराठ्यांना घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांना मराठा बांधवांना केले आहे.

जालना | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईवर धडक मारण्याचा रोड मॅप ठरला आहे. येत्या 20 जानेवारी रोजी ते मुंबईकडे कूच करण्यासाठी अंतरवली सराटी येथून निघणार आहेत. मुंबईतील आंदोलनासाठी प्रत्येक मराठ्याला घरातून बाहेर पडण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. आपल्या वाहनालाच घर बनवा, वाहनाच्या मागच्या सिट काढून टाका, झोपण्याची जागा तयार करा, घरातून जेवण बनवायचं सामान सोबत घ्या, चुली, सरपण, गरम कपडे, अंथरुण सोबत घेण्याचे आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरायचे नाही. अंतरवलीतून 20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरडे खाद्यपदार्थ घ्या, जेवणासाठी ताटे, बादली, पायदुखीच्या गोळ्य़ा घ्या, गोळ्या खा आणि कणाकणा निघायचं असे जरांगे पाटील यांनी सांगितले. कुठलाही उद्रेक होऊ द्यायचा नाही. आपल्या तुकडीवर नीट लक्ष ठेवा बाहेर कोणी माणूस आत आला नाही पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 28, 2023 06:51 PM
कोरोनाच्या JN.1 व्हेरीएंटला घाबरु नका, पण काळजी घ्या, केंद्रिय आरोग्यमंत्री भारती पवार यांचे आवाहन
माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांवर बोला, अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाला इशारा