‘लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दंगली घडवण्याचा डाव’, खैरे यांचा खळबळजनक दावा

| Updated on: Aug 01, 2023 | 9:47 AM

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनी खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर :  ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनी खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. ‘मुस्लिम मतं उद्धव ठाकरे यांना मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे.शिवसेनेच्या कोणत्याही सरकारमध्ये दंगीली झाल्या नाहीत.मिंधे गट आणि भाजप सत्तेत आल्यानंतर दंगली सुरू झाल्या आहेत.पण यात ते यशस्वी होणार नाहीत, हनुमानाचे नाव घेऊन निवडणुका लढवल्यावर काय हाल झाले हे सर्वांनी पाहिलं आहे, असेही खैरे म्हणाले. भारतीय जनता पार्टीच दंगलीला फूस देत आहे.इम्तियाज जलील यांना भाजपनेच उपोषणाला बसवले होते, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाल्याचा आरोप खैरे यांनी केला. यावेळी त्यांनी संजय शिरसाट आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘संजय शिरसाठ खूप बडबड करतात, त्यामुळे संजय शिरसाठ यांना भाजप मंत्रिपद देणार नाही.तर अब्दुल सत्तार आल्यापासून राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. कृषी खात्यात कसे ओरबडता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या हा त्यांचा पायगुण असल्याचे ते म्हणाले’.

Published on: May 15, 2023 04:01 PM
हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर, टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकले; पण का?
‘ब्लडप्रेशर’ आणि औषधांच्या दुकानात देवेंद्र फडणवीस? चंदकांत पाटील यांचं नेमकं विधान काय ?