नितेश राणे यांच्या ‘त्या’ आरोपांवर चंद्रकांत खैरे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल; म्हणाले, “अजून शांत का आहात?”

| Updated on: Jul 12, 2023 | 9:52 AM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटल्यावर राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटल्यावर राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नितेश राणे यांची पत्रकार परिषद बघून प्रचंड संताप आला. कुठे आदित्य ठाकरे आणि कुठे नितेश राणे. तुम्ही कोणामुळे मोठे झालात. आज महाराष्ट्रातली संपूर्ण स्थिती पाहाता उद्धव ठाकरे यांनी कलंक हा शब्द वापरला. भाजपने इतकी लोकं फोडली मग राग येणार नाही का? हे नारायण राणे यांचं पोरगं काहीही बोलायला लागला आहे. उद्धव ठाकरे का शांत बसले आहात? अशा लोकांना सरळच केलं पाहिजे. रामदास कदम यांनी तर नारायण राणे यांना कोंबडी चोर सारख्या किती उपाध्या दिल्या. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी अशी लोकं देवेंद्र फडणवीस यांनीच सोडली आहेत,”असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

Published on: Jul 12, 2023 09:52 AM
तिसरा मंत्रिमंडळ विस्तार : अजित पवार गटाला रेड सिग्नल; शिंदे गटाच्या अशा पल्लवीत, कोणाला लागणार लॉट्री
सनई-चौघड्यांचा आवाज, वऱ्हाडी, मुहूर्तावर अक्षतांचा पाऊस मात्र मंडपात नवरा नवरी नाही तर चक्क गाढवं; काय आहे हा प्रकार?