केंद्रीय मंत्री विरूद्ध शिवसेनेचा बडा नेता? कुठे रंगणार लढत? कराड यांच्या तिकिट मागणीवर कुणाचा पलटवार?

| Updated on: Aug 24, 2023 | 3:44 PM

राज्यात सध्या लोकसेभेच्या निवडणुकीवरून राण तापलेलं आहे. त्यावरून सध्या हेवेदावे केली जात आहेत. तर एकमेकांला आव्हान दिलं आहे. असेच आव्हान केंद्रीय मंत्र्याला शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्याकडून देण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी नगर : 24 ऑगस्ट 2023 | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यादृष्टीने राज्यातील प्रमुख पक्ष हे प्रयत्न करत आहेत. तर आता मतदारसंघनिहाय मोर्चे बांधणी केली जात आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं.त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची येथे ताकद कमी झाली आहे. त्यामुळे येथे भाजपने मला तिकीट द्यावं अशी मागणी केली आहे.

त्यावरून आता जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या नेत्याकडून भागवत कराड यांना थेट आव्हानच दिलं आहे.ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भागवत कराड यांना सुनावले आहे. त्यांनी, कराड यांना टोला लगावताना, हा बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा देखील गड आहे.

त्यामुळे येथे कुणीही कितीही आले तरी त्याचा परिणाम होणार नाही. भागवत कराड यांनी माझ्या समोर उभं रहावं. जर पक्षाने आदेश दिला तर मी असेन. पण तरिही त्यानी उभं रहावं म्हणजे त्यांना शिवसेनेची ताकत काय आहे ते कळेल, असं म्हटलं आहे.

Published on: Aug 24, 2023 03:44 PM
सना खान हत्या प्रकरणात पोलिसांचे कडक पाऊल; काँग्रेस आमदाराची केली कसून चौकशी; नेमकं काय होईल उघड?
रामदास आठवले यांचा लोकसभा मतदार संघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली म्हणाले…