‘त्यांचा आग लावण्याचा डाव’; संजय शिरसाट यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून खैरे यांची आगपाखड

| Updated on: Aug 01, 2023 | 7:16 AM

त्यांनी आदित्य ठाकरे यांनी त्यांना फक्त सौदर्य पाहून तिकीट दिलं असं म्हटलं होतं. त्यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आला आला आहे. तर शिरसाट यांनी हे वक्तव्य करताना प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत ते वक्तव्य ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं असेही म्हटलं होतं.

औरंगाबाद, 31 जुलै 2023 | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत वक्तव्य करत टीका ओढावून घेतली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी त्यांना फक्त सौदर्य पाहून तिकीट दिलं असं म्हटलं होतं. त्यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आला आला आहे. तर शिरसाट यांनी हे वक्तव्य करताना प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत ते वक्तव्य ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं असेही म्हटलं होतं. त्यावरून आता खैरे यांनी शिरसाट यांचा समाचार घेताना, त्यांचा आग लावायचा डाव असल्याची टीका केली आहे. तसेच शिरसाट हा थर्ड क्लास, डान्स बार आणि क्लबमध्ये जाणारा माणूस आहे. हे सगळं दुनियेला माहिती आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिंदे, फडणवीस आणि दादांची प्रतिमा मालिन होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर शिरसाठ हा लावा लाव्या करण्याचे आणि मला बाजूला करण्याचा डाव करतोय. तर वेळ पडली तर आम्ही शिरसाटला शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशाराच खैरे यांनी दिला आहे.

Published on: Jul 31, 2023 02:14 PM
वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार; विदर्भ आंदोलन समितीचा इशारा
बुलढाण्यात राष्ट्रवादी आक्रमक; संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!