“ते कसले वाघ? मोदींचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेलं तेव्हा…”, चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांना पलटवार
कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य उपमुख्यमं देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य उपमुख्यमं देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाघ हे बाळासाहेब ठाकरे आहेत. “मोदी नव्हे.मोदी ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची खुर्ची अडचणीत आली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना मदत केली होती. मला तेव्हा सांगितलं होतं बाळासाहेबांनी की,तुम्ही जाऊन त्यांना गुजरातमध्ये पाठिंबा देऊन या. तेव्हा मी खासदार होतो”, असं खैरे म्हणाले.
Published on: Jun 19, 2023 11:06 AM