नेते चिंतेत, खैरे बिनधास्त!! दसरा मेळावा, शिंदे गट, फडणवीस, 3 मुद्द्यांवर काय म्हणाले?
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फडणवीसांनी केलाय. यावर बोलताना खैरेंनी हलकेच उडवून दिलं. ही हाय लेवलची गोष्ट आहे, नंतर बोलू, असं वक्तव्य खैरेंनी केलंय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः कट्टर शिवसैनिक या नात्याने नेहमीच थेट आणि टोकाची भूमिका घेणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी दसरा मेळावा वादावरही थेटच वक्तव्य केलंय. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) दसरा मेळावा (Dussehra Melava) होणार की नाही, हा वाद आता हायकोर्टात गेलाय. उद्या त्यावर सुनावणी आहे. उद्धव ठाकरेंसह सर्वांना कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माध्यमांसमोर अगदी बिनधास्त प्रतिक्रिया दिली. कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने येईल. महापालिका आम्हालाच परवानगी देईल, असं ते म्हणालेत.
मग याचे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही वेगळे परिणाम होतील का, शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल, असे विचारले असता, काही येणार नाही. शिंदे गट आता लवकरच संपणार आहे, असं त्यांनी बिनधास्त सांगितलं.
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फडणवीसांनी केलाय. यावर बोलताना खैरेंनी हलकेच उडवून दिलं. ही हाय लेवलची गोष्ट आहे, नंतर बोलू, असं वक्तव्य खैरेंनी केलंय.