“पंकजा मुंडे यांची अवस्था एकनाथ खडसेंसारखी”, ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jun 04, 2023 | 8:52 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची शनिवारी बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची शनिवारी बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ खडसे आणि आम्ही एकत्र होतो. गोपीनाथ मुंडे आम्हाला खूप सिनियर होते. खडसे आणि मुंडे परिवाराचे घरोब्याचे संबंध आहेत. ज्यांनी मोठे केले त्यांना विसरू नये असा नियम आहे, मला बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले. मी एकनिष्ठ राहिलो. उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केले. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एकनाथ खडसे यांना भरपूर त्रास दिला. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले असले तरी, त्यांना जो त्रास झाला, तोच त्रास पंकजा मुंडे यांना होत आहे. आणि त्या दृष्टीने एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे भेटले असतील”, असं खैरे म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कृतीवर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांनी आपल्या कृतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.त्यांच्या जिभेला प्रॉब्लेम झाला होता.संजय राऊत यांच्या विरोधात पहिल्यापासूनच इतर लोक आहेत. संजय राऊत काही वाईट बोलले नाहीत, परंतु लोकांनी त्याचा गैर अर्थ काढला. जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत त्यांनाच काही दिवसांनी लोक जोडे मारतील”, असं खैरे म्हणाले.

Published on: Jun 04, 2023 08:52 AM
भाषणा दरम्यान असं काय झालं की पंकजा मुंडे यांना थांबावं लागलं? कार्यकर्ता का ताडकन उठला?
‘… सध्या देशात हेच घडतंय’; पंतप्रधान मोदी यांची स्टॅलिनशी तुलना, ‘सामना’तून काय केला हल्लाबोल?