कुणी काहीही म्हणा, पण विजय सत्याचाच म्हणजे आमचाच!; ठाकरेगटातील ‘या’ नेत्याला विश्वास

| Updated on: Feb 28, 2023 | 2:59 PM

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू आहे. यावर ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. पाहा ते काय म्हणालेत...

चंद्रपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू आहे. यावर ठाकरे गटातील नेत्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरेगटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे “सुप्रीम कोर्टात आमचाच विजय होईल. अशी अपेक्षा आहे. आमच्या वकिलांनी अतिशय योग्य भूमिका मांडली आहे. मात्र निर्णयाला अजून किती दिवस लागतील, या बाबत काही सांगता येणार नाही.सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, असं सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Feb 28, 2023 02:58 PM
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत झोपीचं सोंग घेतंय; कुणाचं टीकास्त्र
‘या’ नेत्यानं व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा; म्हणाले, ‘सत्ता सगळ्यांनाच हवी असते…’