Chandrakant Khaire | ‘शिवसेनेवरील संकट दूर होऊ दे’, कामाख्या देवीला चंद्रकांत खैरे यांचे साकडे

| Updated on: Aug 13, 2022 | 3:16 PM

Chandrakant Khaire | बंडखोरांनंतर आता चंद्रकांत खैरे ही कामाख्या देवीच्या चरणी नतमस्तक

Chandrakant Khaire | बंडखोरानंतर (Rebel) शिवसेना नेते चंद्रकांत खेरै (Chandrakant Khaire) हे ही कामाख्या देवीच्या (Kamkhya Temple) चरणी नतमस्तक झाले आहेत. शिवसेनेवर (Shiv Sena) सध्या चहुबाजुंनी संकटांचे ढग जमले आहेत, ते दूर सारु दे, संकट दूर होऊ दे असे साकडे खैरे यांनी देवीला घातले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुरत गाठले होते. तिथला मुक्काम त्यांनी तातडीने हलवला. त्यांनी लागलीच गुवाहाटीत (Guwahati) तळ ठोकला. या तळावर नंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांची विमाने उतरली. अनेक दिवस शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत तळ ठोकून होते. याठिकाणी सर्व भाजपासोबतची सर्व गुपीत खलबते पूर्ण झाली आणि मुंबईत येण्याचा रस्ता मोकळा झाल्यानंतर गोवा मार्गे बंडखोर मुंबईत दाखल झाले होते. गुवाहाटी मुक्कामात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी खैरे यांनी शिंदेंवर टीका केली होती. कामाख्या देवीचा आशिर्वाद उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता त्यांनी पुन्हा शिवसेनेसाठी देवीला साकडे घातले आहे.

Published on: Aug 13, 2022 03:16 PM
‘आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा’-पंकजा मुंडे
Chandrakant Khaire On Rebel | पाचही बंडखोरांना आडवं करु, चंद्रकांत खैरै यांचा शिंदे गटातील आमदारांना थेट इशारा