चंद्रकांत खैरे कायम माजी खासदारच राहतील, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची टीका

| Updated on: Mar 23, 2024 | 2:42 PM

संभाजीनगर लोकसभा जागेसाठी भाजपातून इच्छुक असलेले केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आपचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. कोणीही पैसे खावेत आणि भ्रष्टाचार करावा ही जनतेची अपेक्षा नाही. कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी नेत्याला जेलमध्ये टाकलेच पाहीजे ही जनतेची अपेक्षा असल्याचे कराड यांनी म्हटले आहे.

संभाजीनगर : संभाजीनगरची जागा महायुतीत कोण लढविणार ? याचा तिढा अद्याप संपलेला नाही. छत्रपती संभाजीनगर शहर मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचे शहर आहे. महायुती ही जागा लढविणार आहे. तीन पक्ष बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. हे इलेक्शन चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी आहे. त्यामुळे वरच्या लेव्हल थोडा वेळ जरी लागला तरी फरक पडणार नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते काम करीत आहोत. आमचा दृढनिश्चय आहे. की ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचा खासदार महायुतीचा असला पाहीजे, त्यांना मत देणारा असाला पाहीजे असेही भागवत कराड यावेळी म्हणाले. मग ही जागा भाजपला सुटली, राष्ट्रवादीला सुटली की शिवसेना हा विषय गौण आहे. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. सुटली तर चांगलेच आहे, नाही सुटली तरी आम्ही एकत्र लढणार आहोत असेही त्यांनी सांगितले. शिंदे गटात संदीपान भुमरे यांना जरी संधी मिळाली तरी आनंदच आहे. इम्तियाज जलिल यांना लोकसभेतून आम्ही हद्दपार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात वाद सुरु आहेत. यावर विचारले असता चंद्रकांत खैरे यांनी 20 वर्षांत काय काम केले हे सांगावे आणि बक्षिस घेऊन जावे. ते कायम माजी खासदार राहणार असल्याची टीका कराड यांनी यावेळी केली.

Published on: Mar 23, 2024 02:39 PM
‘…तर मी शिवसेनेतून बाहेर पडेल…’, काय म्हणाले विजय शिवतारे
आम्ही एवढे गुलाम नाही, लाचार नाही, बच्चू कडू यांनी दिला महायुतीला इशारा