Chandrakant Patil : अमृत योजना आणली पण आमचं सरकार गेलं, आता अमृतसाठी महामंडळ निर्माण करू- मंत्री चंद्रकांत पाटील
'अनेक समजाच्या मागण्या असतात.की काही योजना किंवा महामंडळ करता येतील का? अमृतची योजना आणली पण आमचं सरकार गेलं. आता अमृतसाठी महामंडळ निर्माण करू, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती.
पुणे : भाजपचे (BJP) नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दोन मुद्द्यांवर भाष्य केलंय. आधी त्यांनी प्रो दहीहंडी आणि त्यानंतर अमृत योजनेवर (Amrut Yojana) प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे. पण देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या वर येऊन त्यांच्या स्वतःचा कर्तुत्वावर आले आहेत. पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतं. अनेक समजाच्या मागण्या असतात की काही योजना किंवा महामंडळ करता येतील का? त्यामुळे अमृतची योजना आणली पण आमचं सरकार गेलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर खूप काम करायला सुरुवात केलं आहे. अमृतसाठी महामंडळ निर्माण करू. अधिवेशन एकदा झालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः यासाठी एक बैठक घेण्याचा आग्रह करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.