Sanjay Raut : हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा; राऊतांचा शिंदेंना आव्हान
तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवता. पण त्यांचा अपमान होताना एक शब्द बोलत नाही. अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसता. तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात
मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्यावरून राज्यातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरूनच खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या, अशी ही मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवता. पण त्यांचा अपमान होताना एक शब्द बोलत नाही. अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसता. तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. यामुळेच तुम्हाला महाराष्ट्रातील जनता मिंधे म्हणत असेल तर त्यात काय चुकलं, असा सवाल केला आहे. तर जे बाळासाहेंबाचा अपमान कतरतील त्यांच्या ढूंगनावर लाथ मारून मंत्रिमंडळाबाहेर काढा असेही ते म्हणाले.