एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, सून मात्र भाजपमध्येच; ही नाथाभाऊंची खेळी? चंद्रकांत पाटील म्हणतात…

| Updated on: Jul 17, 2023 | 8:24 AM

एकनाथ खडसे यांनी जानेवारीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर त्यांच्या सूनबाई रक्षा या भाजपमध्ये खासदार आहेत. रक्षा खडसे भाजपमध्ये राहिल्याने चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

जळगाव, 17 जुलै 2023 | मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी जानेवारीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर त्यांच्या सूनबाई रक्षा या भाजपमध्ये खासदार आहेत. रक्षा खडसे भाजपमध्ये राहिल्याने भाजप नेहमी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना अप्रत्यक्ष सवाल केला आहे. “तुमच्या सुनबाई भाजपमध्ये आहेत त्यांचं काय करायचं? सुनबाई या भाजपमध्ये राहू द्या, मी राष्ट्रवादीत राहतो काही अडचण आली तर पाहून घेऊ असं खडसेंचं धोरण चालू आहे का? मला काही अडचण आली तर अमित शाहांकडे जाऊन प्रश्न सुटतील हे खडसेंचं धोरण आहे, अशा आशयाची क्लिप माझ्याकडे आहे,” असं पाटील म्हणाले.

Published on: Jul 17, 2023 08:24 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ का सोडली? शिवसेना नेता म्हणतो, ‘अजितदादा वरचढ ठरत…’