Chandrakant Patil : दहीहंडी खेळ नव्यानं अ‍ॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते- मंत्री चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 20, 2022 | 11:11 AM

'दहीहंडी खेळ नव्याने अ‍ॅड केला आहे. उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय?' असा सवाल भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिकाकारांना केलाय.

पुणे :  भाजपचे (BJP) नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘प्रो दहीहंडी’च्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडी खेळाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहंडी (Dahihandi) खेळ नव्याने अ‍ॅड केला आहे. उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिकाकारांना केलाय. ते पुढे म्हणाले की, ‘एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. आधी जे खेळ यात होते त्यात हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यात कुठलीही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ जोडला आहे. तशी कुणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कुणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू.

Published on: Aug 20, 2022 11:11 AM
Ajit Pawar : मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, अजित पवारांची प्रतिक्रिया
Chandrakant Patil : अमृत योजना आणली पण आमचं सरकार गेलं, आता अमृतसाठी महामंडळ निर्माण करू- मंत्री चंद्रकांत पाटील