कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची भूमिका काय?
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका काय ते स्पष्ट केलं. पाहा...
पिंपरी चिंचवड : भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची जागा रिक्त झालीये. या ठिकाणी पोट निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका सांगितली. “चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र गाफील न राहता निवडणुकीसंदर्भात पूर्व तयारी आणि बैठका घेतोय. उमेदवारी संदर्भात दिल्लीमधून निर्णय होईल. पुढे काय होईल ते पाहुयात”, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
Published on: Jan 25, 2023 03:39 PM