तर आम्ही टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊ; चंद्रकांत पाटील यांचं विरोधकांना आव्हान

| Updated on: Feb 06, 2023 | 10:29 AM

भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली. चंद्रकात पाटील या निवडणुकीवर बोललेत. पाहा...

पुणे : भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली. त्यावर बोलताना कसब्याची निवडणूक बिनविरोधे होण्याचं कारण नाही. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर त्यावर विचार केला असता, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना आव्हान दिलंय. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो. तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. शिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही जगताप यांच्या कुटुंबातीलच उमेदवार दिली आहे. मग तिकडे का बिनविरोध तुम्ही निवडणूक बिनविरोध केली नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Published on: Feb 06, 2023 10:29 AM
सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज घेणार देवेंद्र फडणवीस यांची भेट
अखेर काँग्रेसचं ठरलं! कसबा पोटनिवडणुकीत ‘या’ नेत्याला उमेदवारी