पुण्यातील पाणीप्रश्न मिटणार? चंद्रकांत पाटील यांनी सांगितला उपाय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. कारण,या शहरासाठी त्यांनी मेट्रो आणली. या शहरासाठी अनेक प्रकल्प ते आणत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम ते करत आहेत. सांडपाणी शुद्धीकरण आणि 24 तास या शहराला पाणी देण्याचं काम ते करणार आहेत.
पुणे: मनपाच्या अंतर्गत सुस पाणीपुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी पुण्यातील पाणीप्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. चाकण एमआयडीसीबरोबर बैठक झाली आणि त्यांनी फिल्टर केलेलं पाणी त्यांना द्यायचं मान्य केलं. यामुळे आपल्याला चाकण एमआयडीसीचा कोटा मिळेल.त्यानंतर आम्ही रांजण गावच्या एमआयडीसीशी बोलतोय,असंही पाटील यांनी सांगितलं. असं करता करता आपलं वापरलेलं पाणी हे इंडस्ट्री वापरेल आणि इंडस्ट्रीजचा कोटा आपल्याला मिळेल.अशाप्रकारे पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सगळी आवश्यकता पूर्ण करता येईल.याचे श्रेय मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतो. भाजपचा नेता म्हणून नाही तर सर्वसामान्य माणूस म्हणून मी त्यांचे आभार मानतो कारण,या शहरासाठी मेट्रो त्यांनी आणली. या शहरासाठी अनेक प्रकल्प ते आणत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम ते करत आहेत. सांडपाणी शुद्धीकरण आणि 24 तास या शहराला पाणी देण्याचं काम ते करणार आहेत. या शहराचा पालकमंत्री म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. चंद्रकात पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल अशी शक्यता आहे.