Aashish Shelar : चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळात वर्णी..! आशिष शेलारांच्या पदरी काय पडणार?
भाजपाचे 12 आमदार हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये आशिष शेलार यांचे नाव मागे पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. आगामी काळातील महापालिका आणि इतर निवडणुका लक्षात घेता हा निर्णय भाजपा पक्षाकडून घेतला जाऊ शकतो. संघटन कौशल्य पाहून ही जाबबदारी दिली जाणार आहे.
मुंबई : मंगळवारी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांचा यामध्ये समावेश होणार असून चंद्रकांत पाटील यांचीही वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिपदी दादांची लॉटरी लागली तर मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ही आशिष शेलार यांच्यावर येणार आहे. मंत्रमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपा पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. भाजपाचे 12 आमदार हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये आशिष शेलार यांचे नाव मागे पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. आगामी काळातील महापालिका आणि इतर निवडणुका लक्षात घेता हा निर्णय भाजपा पक्षाकडून घेतला जाऊ शकतो. संघटन कौशल्य पाहून ही जाबबदारी दिली जाणार आहे.