आज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चंद्रपुरात काय स्थिती? पाहा व्हीडिओ…
चंद्रपूर जिल्ह्यात 9 बाजार समित्यांसाठी आज मतदान; मतदान केंद्रावर संमिश्र प्रतिसाद; पाहा व्हीडिओ...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 पैकी 9 बाजार समित्यांसाठी मतदान होत आहे. 28 आणि 30 एप्रिल अशा 2 टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेलल. 12 बाजार समित्यांच्या प्रत्येकी 18 अशा 216 संचालक पदांसाठी 476 उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस समर्थक उमेदवार अशीच लढत होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी भाजपने आश्चर्यकारकरीत्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवली आहे. यापैकी भद्रावती बाजार समितीत भाजपने उमेदवाराच दिला नसून भाजपचा गड असलेल्यामुळे बाजार समितीत केवळ दोन पक्ष समर्थीत उमेदवार रिंगणात आहेत. तर ब्रम्हपुरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती झाली आहे. शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून पक्षनिष्ठा बाजूला ठेवून जिल्ह्यातील अनेक बाजारांवर समित्यांमध्ये विरोधकांशी हातमिळवणी केली गेली आहे. जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह एकूण 13197 मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासून विविध तालुकास्थळी मतदान प्रक्रियेला उत्साही सुरुवात झाली आहे.