‘अजितदादांचं वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं’, ते तर धरणवीर आहेत : बावनकुळे

| Updated on: Jan 03, 2023 | 2:29 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी केलेलं हे वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं आहे. तर यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असेही बावनकुळे म्हणाले

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आजही राज्यात अनेक ठिकाणी अंदालने करण्यात येत आहेत. भाजपकडून आज देखिल दादर, चेंबूर आणि नागपुरात आंदोलने करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका करताना, त्यांनी केलेलं हे वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं आहे. तर याबाबत अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असेही बावनकुळे म्हणाले. इतकेच काय तर बावनकुळे यांनी अजित पवार हे धरणवीर आहेत असा टोलाही लगावला आहे.

त्याचबरोबर औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी त्यांचा छळ केला. तेव्हा धर्माचं रक्षण करणारे संभाजीराजे होते. कितीही अत्याचार केला गेला तरी त्यांनी धर्म सोडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुघलशाही स्वीकारली आहे. ती राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

Published on: Jan 03, 2023 02:29 PM
सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला; ते, अमृता फडणवीस, चितळे यांच्याबद्दल कधीही का बोलत नाहीत?
Ambadas Danve | जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांच्याकडून विरोध