उमेदवारीवरून आमच्याच कुठलेही वाद किंवा नाराजी नाही : चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Jan 11, 2023 | 12:13 PM

विधान परिषद निवडणूकीवरून प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आधीच एकला चलाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळत आहे.

नागपूर : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह मीत्र पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच्याआधीच सध्याच्या सरकारमध्ये असणाऱ्या भाजप- शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याच्या चर्चांना उधान आला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधान परिषद निवडणूकीवरून प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आधीच एकला चलाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळत आहे.

यावरून बावनकुळे यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याविरुद्धची भाजप- शिवसेनेत कुठलेही वाद किंवा नाराजी नाही. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी समन्वयातूनच उमेदवार दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर शिक्षक, पदविधर मतदार आमच्या बाजूनं, पाचंही जागा आम्ही जिंकू असा दावा ही त्यांनी केला आहे.

Published on: Jan 11, 2023 12:13 PM
सकाळचे टोमणे बंद करा, राऊतांवर बावनकुळेंची टीका
हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीची छापेमारी, पाहा व्हीडिओ…