2024 ला संजय राऊत यांना अभिनंदन करण्यात भाग पाडू : बावनकुळे

| Updated on: Mar 10, 2023 | 12:11 PM

कसब्यातील त्यांचा विजय हा फक्त 4 टक्क्यांमुळे आहे. आम्ही आमचा पराभव मान्य केला. पण आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांना परास्त करण्याची ताकद ठेवतो

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खरमरीत टीका करत ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि भाजपला अधोगती आली असं म्हटलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी संजय राऊत पलटवार केलेला आहे. त्यांच सरकार जाऊन आता आमचं सरकार आलयं. त्यामुळे त्यांच्या पोटात बॉम्ब उठला आहे. हा बॉम्ब त्यांना काही दिवस झोपू देत नाहीये. तर कसब्यातील त्यांचा विजय हा फक्त 4 टक्क्यांमुळे आहे. आम्ही आमचा पराभव मान्य केला. पण आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांना परास्त करण्याची ताकद ठेवतो. आम्ही सुद्धा आमची संघटनात्मक ताकद वाढवतोय आणि संजय राऊत यांना 2024 ला कळेल ते नक्कीच माझ अभिनंदन करतील. संजय राऊत यांना अभिनंदन करण्यात भाग पाडू.

Published on: Mar 10, 2023 12:10 PM
रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई, किरीट सोमय्या यांची माहिती
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, भोपळा हाती घेऊन आक्रमक; बघा व्हिडीओ