अजित पवार यांच्यानंतर शरद पवार भाजपसोबत येणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान

| Updated on: Jul 30, 2023 | 12:26 PM

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार यांनी भाजपसोबत येण्यासाठी मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

परभणी, 30 जुलै, 2023 | अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंद-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार यांनी भाजपसोबत येण्यासाठी मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. शरद पवार भाजपसोबत येणार का? असा सवाल बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल.” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.

 

Published on: Jul 30, 2023 12:26 PM
रासप नेते जानकर यांनी दंड थोपाटले; मात्र परभणीत भाजपची वेगळीच खेळी; थेट रासप आमदारालाच…
मुंबईत पावसाचा जोर कमी, तरीही जुहू बीच रिकामा केला, काय कारण?