2024 च्या निवडणुकांसाठी अजित पवार भाजपचा प्रचार करणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले….

| Updated on: Jul 30, 2023 | 11:01 AM

2024 च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी करत आहे. भाजपच्यावतीने घर चलो अभियान राबवले जात आहे. या अभियानानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

परभणी, 30 जुलै, 2023 | 2024 च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी करत आहे. भाजपच्यावतीने घर चलो अभियान राबवले जात आहे. या अभियानानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील. आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत.”

Published on: Jul 30, 2023 11:01 AM
रोहित पवार यांना दिलासा, बारामती अॅग्रो लिमिटेडवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती, सुनावणी 11 सप्टेंबरला
Moscow Russia | ड्रोनच्या हल्ल्यानं रशियातील मॉस्को हादरला, दहशतवादी हल्ला असल्याचा दावा