भाजप नेत्याच्याच ऑफर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारं बंद!”
भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी, असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी, असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे.उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता आमचे दार बंद आहे.आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. आमची त्यांच्याशी कुठलीही चर्चा सुरू नाही”, असं बावनकुळे म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 05:08 PM