“अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होतील असं वाटलं होतं”, भाजप नेत्याचा राष्ट्रवादीला चिमटा

| Updated on: Jun 25, 2023 | 11:53 AM

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करून संघटनेचं काम करण्यासाठी जबाबदारी मागिती.त्यांच्या या विधानानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती : अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करून संघटनेचं काम करण्यासाठी जबाबदारी मागिती.त्यांच्या या विधानानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणुक वेळोवेळी दाखवली आहे.त्यांना पक्षात काम करायची इच्छा बोलून दाखवावी लागली हेच खरं दुर्दैव आहे.संघटनेच्या बैठकीत अजितदादांना बोलावं लागतं. खरतरं अजितदादांना कार्याध्यक्षपदी नेमलं जाईल असं वाटलं होतं पण नंतर त्यांनी सुप्रियाताई आणि प्रफुल पटेल यांना संधी दिली.अजितदादांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसींना संधी देण्याची मागणी केली.आता राष्ट्रवादीला ओबीसींची आठवण आली हेही गंमत आहे.आता जे सुरुय ते नाटकाचा भाग आहे. नाटक कंपनी करायची आहे. सगळ्यांना माहितीय भाकरी फिरणार नाही.उद्या जर अजितदादांना प्रदेशाध्यक्ष केलं तर ते त्यांचा पक्ष चालवतीलपण पवारसाहेब भाकरी फिरवतील का ही शंका आहे,” असं बावनकुळे म्हणाले.

 

Published on: Jun 25, 2023 11:53 AM