अखेर भाजप-मनसे युती झाली!; चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं…
मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात मागच्या काही दिवसांपासून होत आहे. या युतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलंय.
पुणे : मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात मागच्या काही दिवसांपासून होत आहे. या युतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलंय. कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला आम्ही विनंती केली होती. मात्र त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. आम्ही राज ठाकरेंना पण पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यांनी आम्हाला पाठींबा द्यायचं जाहीर केलं आहे. केवळ कसबा पोटनिवडणुकीसाठी ही युती आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आम्ही राज ठाकरेंना आम्ही विनंती करणार आहोत की, त्यांनीही प्रचारात सहभागी व्हावं. त्यांनी कसब्यात सभा घ्यावी, असं बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 15, 2023 02:58 PM