संजय राऊतजी, मनात मतभेद ठेवू नका, फक्त एवढी एक गोष्ट करा!; चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन

| Updated on: Mar 07, 2023 | 2:32 PM

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राची जनता सरकारकडून विकास मागते आहे. तो अपेक्षित विकास आपण सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जनतेला न्याय दिला पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत. पाहा...

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना एक आवाहन केलं आहे. “संजय राऊतसाहेबांनी उद्यापासून कुठलेही मतभेद मनात ठेवू नयेत. त्यांनी आमच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे”, असं बावनकुळे म्हणाले आहेत. सध्या जे टोकाचं राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासासाठी एकत्र आलं पाहिजे. आम्ही आज आमच्यापासून ही सुरुवात करत आहोत. सर्वांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहनही बावनकुळे यांनी केलं आहे.

Published on: Mar 07, 2023 02:31 PM
अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाच्या सूचना, पाहा…
होळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘त्या’ वक्तव्याची आठवण, बघा काय म्हणाले?