सत्यजीत तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला की नाही? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

| Updated on: Jan 28, 2023 | 7:47 AM

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पाहा...

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजीत तांबे यांनी आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही. पण आमचा तिथं अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना आवडणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील, असं बावनकुळे म्हणालेत.  नाशिकमध्ये भाजपचे मतदार अपक्षला मतदान करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

Published on: Jan 28, 2023 07:39 AM
भाजपच्या अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अमरावतीत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन, अभिनेत्री अमृता खानविलकरची उपस्थिती