पहाटेच्या शपथविधीवेळी ‘या’ नेत्यांनी मिळून निर्णय घेतला; फडणवीसांपाठोपाठ बावनकुळे यांचे मोठे खुलासे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल tv9 मराठीशी बोलताना पहाटेच्या शपथविधीबाबत महत्वाचे गौप्यस्फोट केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे खुलासे केले आहेत. पाहा...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल tv9 मराठीशी बोलताना पहाटेच्या शपथविधीबाबत महत्वाचे गौप्यस्फोट केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे खुलासे केले आहेत. पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय घडलं ते बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला. त्यामुळे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर माहिती आहे. देवेंद्रजी काल जे काही बोलले तेच वास्तव आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची छुपी युती होती. त्यांनी आधीच सगळं ठरवलं होतं, असंही बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 14, 2023 12:53 PM