स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा कधी आणि कुठे असणार?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही यात्रा होणार आहे. सगळे युतीतील खासदार, आमदार आणि दोन्ही पक्षाचे नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पाहा व्हीडिओ...
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेबद्दल माहिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा 288 मतदारसंघात 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या गौरव यात्रेत प्रत्येक विधानसभेच्या मोठ्या दोन शहरात ही गौरव यात्रा होणार आहे. ठाणे विभागात नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुरली मोहोड, विक्रम पावस्कर प्रमुख राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात यात्रा प्रमुख असणार विजय चौधरी, जयकुमार रावल पश्चिम विदर्भात रणधीर सावरक, संजय कुटे तर पूर्व विदर्भात आ. विजय रहांगडाले, प्रविण दटके यांच्यावर या यात्रेची जबाबदारी असणार आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
Published on: Mar 28, 2023 02:30 PM