पहाटेच्या शपथविधीवर दावे-प्रतिदावे, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “शरद पवार यांच्या गुगलीवर फडणवीस यांचा षटकार!”

| Updated on: Jun 30, 2023 | 10:59 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत आमच्यासोबत डबलगेम केला, असं वक्तव्य केलं होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असा पलटवार केला. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत आमच्यासोबत डबलगेम केला, असं वक्तव्य केलं होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असा पलटवार केला. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षात एवढा मोठा षटकार मारला की तो बॉलच आता मिळत नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता आणली आहे. पवार साहेब यांनी कितीही गुगल्या टाकल्या तरी फडणवीस साहेब षटकार मारले.शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला हे आज मान्य केलं.”

Published on: Jun 30, 2023 10:59 AM
Special Report : 2024 च्या निवडणुकीत नेतृत्व एकनाथ शिंदेंच, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
“देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यात तथ्य”, पहाटेच्या शपथविधीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया