“कलंकित करंटा कोण? तर उद्धव ठाकरे”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 11, 2023 | 3:36 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाने भाजप आक्रमक झाला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाने भाजप आक्रमक झाला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,”देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्य याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तुत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला.महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. तेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटण्याच कलंकित काम उद्धव ठाकरे यांनी केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाचं आरक्षण घालवणारा माणूस म्हणजे कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जपण्यासाठी मरमर काम करतात. मात्र, हा कलंकित करंटा (उद्धव ठाकरे) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना साथ देतो.”

Published on: Jul 11, 2023 03:36 PM
अजित पवार गटाच्या सत्तेत प्रवेशाने शिंदे गटाच्या….; उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपावरून साधला निशाना
“आम्हाला 7 मंत्रिपदं मिळणार अन् मीच रायगडचा पालकमंत्री होणार”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा