यंदा लाल मिर्ची रडवणार, बदलत्या वातावरणाचा फटका
याच अवकाळीचा फटका भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादकालाही बसल्याचे समोर येत आहे. येथील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या मिरची पिकास अवकाळीमुळे चांगलाच मोठा फटका बसला आहे.
भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिकं हिरावलं गेलं आहे. यामुळे शेतकऱ्याची स्थिती ही सैरभैर झाली आहे. याच अवकाळीचा फटका भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादकालाही बसल्याचे समोर येत आहे. येथील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या मिरची पिकास अवकाळीमुळे चांगलाच मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर बदलत्या वातावरणामुळे लाल मिरचीला बुरशी लागली आहे. यामुळे मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे बुरशी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आलेली आहे.
Published on: Apr 26, 2023 10:38 AM