सत्यजित तांबे यांचा सोशल माध्यमावरून काँग्रेसला रामराम, यासह आणखी घडामोडी २४ बातम्यांमध्ये

| Updated on: Jan 18, 2023 | 11:20 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( mns chief raj thacakarey ) यांच्या जोरदार स्वागताची तयारी परळीमध्ये ( parli ) करण्यात आली आहे. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( satyajit tambe ) यांनी आपल्या सोशल माध्यमावरून काँग्रेसला रामराम केला आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जामिनावर सुटलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जमीन […]

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( mns chief raj thacakarey ) यांच्या जोरदार स्वागताची तयारी परळीमध्ये ( parli ) करण्यात आली आहे. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( satyajit tambe ) यांनी आपल्या सोशल माध्यमावरून काँग्रेसला रामराम केला आहे.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जामिनावर सुटलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जमीन अर्ज रद्द करावा अशी याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे ( uddhav thacakrey ) , राष्ट्रवादीचे अजित पवार ( ajit pawar )  आणि कॉंग्रेसचे नाना पटोले ( nana patole ) उपस्थित रहाणार आहेत.

Published on: Jan 18, 2023 11:20 AM
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळी सज्ज, अबे! केवढा मोठ्ठा हार, तर कुठे हुरडा
विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र, संजय राऊत म्हणाले, बाप चोरणारी टोळी