“मविआत एकमेकांबाबत शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा सल्ला
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटाच्या नेत्यावर प्रतिक्रिया देताना थुंकले. यावरून सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जुन्या विधानाचा दाखला दिला आहे.यासंपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटाच्या नेत्यावर प्रतिक्रिया देताना थुंकले. यावरून सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जुन्या विधानाचा दाखला दिला आहे.धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा खेद असल्याचंही म्हटलं आहे. यासंपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना एकमेकांवर शेरेबाजी करण टाळलं पाहिजे, अशाने वज्रमुठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.