बंडानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांची जयंत पाटील यांच्यावर टीका; म्हणाले, “तुम्ही हलणार नाही पण…”
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आज बैठक बोलवण्यात आली होती. अजित पवार गटाचा वांद्रे येथील एमईटी मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मुंबई: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आज बैठक बोलवण्यात आली होती. अजित पवार गटाचा वांद्रे येथील एमईटी मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, “बबन पाचपुतेंना जबाबदारी दिली. दादांनी त्यादिवशी कुणी किती दिवस काम केलं ते सांगितलं. आताचे जे आमचे प्रदेशाध्यक्ष ते साडेपाच वर्षांपासून आहेत. तीन वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजे. आम्ही सांगतोय सगळ्यांच्या निवडणुका घ्या. पण, प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची नाही. मग आमची निवडणूक कशाला घेता.”तुम्ही हलणार नाही आणि बाकीच्यांना सांगता आहात की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण मेन रोटला बसलेला आहे, तो फिरवायचा की नाही? त्यांना तरी समजायला पाहिजे. त्यामुळे हे हळूहळू हे झालं. काही वेळी काही गोष्टी होतात.”