जागा वाटपावरून महायुतीत बेबनाव, छगन भुजबळ आणि संजय शिरसाट यांच्यात जुंपली

| Updated on: Dec 29, 2023 | 9:22 PM

भाजपाने शिवसेनेत फूट पाडून संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले असतानाही पुन्हा राष्ट्रवादीत फूट पाडली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात नेहमीच सत्तासंघर्ष पहायला मिळत आला आहे. आता जागा वाटपावरुन अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ समसमान जागा वाटपाची भूमिका जाहीर केल्याने महायुतीत बेबनाव तयार झाला आहे.

Follow us on

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : जागावाटपावरुन महायुतीत जुंपली आहे. महायुतील सहभागी शिंदे गट आणि अजित पवार गटात त्यामुळे वाकयुद्ध सुरु झाले आहे. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हाला हव्या अशी मागणी केल्यानंतर त्यास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमची मते तुमच्या नेत्यांसमोर मांडा. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही जर अशी जाहीर विधानं करायला लागलात तर फूट पडायला वेळ लागणार नाही अशी टिका आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे. महायुतीत समसमान जागाचं वाटप ठरले होते. अजित पवार यांनी त्याचं मत मांडले आहेत. जेवढे आमदार शिंदे गटाचे आले आहेत. तेवढेच आमदार आमच्या गटाचे आल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यावर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी भुजबळ यांना इशारा वजा सल्ला दिला आहे.