Video | गुलाल उधळला मग आता उपोषण का ? छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळाव्यात सवाल
मराठा समाजाचा लाखोंचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीवर आणल्यानंतर सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढला आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले. परंतू या अध्यादेशानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे धोका निर्माण झाल्याचे सांगत विरोध सुरु केला आहे. शनिवारी नगर येथे झालेल्या ओबीसीच्या एल्गार मेळाव्यात भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.
नगर | 3 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चलो मुंबईचा नारा देत आंदोलन पुकारले. त्यानंतर सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा आंदोलनाची यशस्वी समाप्ती केली. या घटनेनंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी या अध्यादेशावर हरकती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी नगर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पूर्ण झाल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. मग आता मागासवर्गाचे सर्वेक्षण कशासाठी सुरु आहे असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले म्हणून जरांगे यांनी गुलाल उधळला आहे. मग आता जरांगे पुन्हा उपोषण नेमके कशासाठी करताय असाही सवाल भुजबळ यांनी केला आहे.